शिवसेनेला कोकणातून हद्दपार करणार-नारायण राणे


संपुर्ण कोकणातुन शिवसेनेला हद्दपार करणार भीम 
गर्जना भाजपाचे नेते नारायण राणे यांनी केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या अकरापैकी एकही आमदार निवडून येणार नाही, सगळ्यांन घरी बसवणार असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे. येणाऱ्या काळात शिवसेनेला हिसका दाखवू असे  सिंधुदुर्गात झालेल्या पत्रकार परिषदेत केले. ५६ आमदार घेऊन फिरणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांची संख्या कमी होईल असंही राणेंनी म्हटलं आहे.

नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी टीका केली. शिवसेनेचे १४५ आमदार निवडून आलेले नाहीत. त्या बळावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेले नाहीत. त्यामुळे ते बाहेर पडले तर तुमचे किती आमदार असा प्रश्न लोक त्यांना विचारतील म्हणून ते पिंजऱ्यातून बाहेरच पडत नाहीत असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

Post a Comment

0 Comments