मंदिरे उघडण्यासंदर्भात निर्णय दिवाळीनंतर घेतला जाईल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे



दिवाळीच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी अनेक अनेक मुद्यांवर भाष्य केले. राज्यात मंदिरे कधी सुरू होणार असा प्रश्न सर्वाना पडला होता, यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्टीकरण दिले आहे. राज्यातील मंदिरे उघडण्यासंदर्भात दिवाळीनंतर निर्णय घेतला जाईल अस मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यातील मंदिरे उघडण्यासंदर्भात दिवाळीनंतर निर्णय घेतला जाईल. मात्र, त्याबाबत घाई करून चालणार नाही. सर्वप्रथम आपल्याला मंदिरे सुरु करण्यासंदर्भातील नियमावली तयार झाली पाहिजे. अन्यथा मंदिरात तासनसात नामस्मरणात तल्लीन राहणाऱ्या आपल्या घरातील ज्येष्ठांना धोका निर्माण होऊ शकतो. मंदिरे उघडत नाही म्हणून अनेकजण माझ्यावर टीका करत आहेत. मात्र, मला तुम्हा सगळ्यांची काळजी असल्यामुळे मंदिरे उघडण्याचा निर्णय योग्यवेळीच घेतला जाईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments