लोकवार्ता I राशीभविष्यशुक्रवार, ३०ऑक्टोबर २०२०


मेष :
लाभाच्या संधी प्राप्त होतील. मानसिक स्वास्थ्य जपावे. कठीण कामे सुलभतेने होतील. अति तिखट पदार्थ खाऊ नका.

वृषभ :
जुनी कामे मार्गी लागतील. जवळच्या व्यक्तीचा सल्ला उपयोगी ठरेल. व्यापारी वर्गाला नवीन अनुभवाला सामोरे जावे लागेल. कामे मनासारखी झाल्याने मन प्रसन्न राहील.

मिथुन :
मित्र परिवाराच्या स्नेहाला जपा. व्यावसायिक उन्नती होईल. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा. तुमच्या कृतीला विरोध होऊ शकतो. 

कर्क :
भावंडांची साथ मिळेल. अपेक्षित यशासाठी जोरात प्रयत्न करावेत. दूरचे प्रवास संभवतात. ईश्वरावरील श्रद्धा दृढ होईल

सिंह :
फसवणुकीपासून सावध रहा. पैशाचा विनिमय विचारपूर्वक करावा.मित्रांच्या भेटीचे योग. विनाकारण शंका घेऊ नका.

कन्या :
 नानाविध रंगांनी भरलेला दिवस. रूचकर भोजनाचा आस्वाद घ्याल. प्रलंबित कामे मार्गी लावाल. आहारावर नियंत्रण हवे.

तूळ :
 ठामपणे निर्णय घ्या. आपली इतरांवर छाप पडेल. पोटाचे विकार त्रस्त करू शकतात. जोडीदाराशी मतभेदाची शक्यता.

वृश्चिक :
घरामध्ये मोठी खरेदी कराल. आजचा दिवस चांगला जाईल. मुलांची चिंता सतावेल. कोणत्याही प्रकारच्या वादात पडू नका.

धनु :
जन संपर्कातून लाभ होईल. कलेत प्राविण्य मिळवाल. आजचा दिवस संमिश्र जाईल. दिवसाच्या उत्तरार्धात चांगली बातमी मिळेल. 

मकर :
पैसे खर्च करताना विचार करावा. योग्य व्यक्तीच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्या. मित्रांचे मोलाचे सहकार्य लाभेल. हातातील कामे पार पडतील.

कुंभ :
स्वकर्तृत्वावर झेप घ्या. मित्रांचा सल्ला उपयोगी पडेल. क्षुल्लक समस्येतून मार्ग निघेल.  दिवसाचा उत्तरार्ध दिलासादायक असेल.

मीन :
मनातील इच्छा पूर्ण होईल. नोकरीत स्वत:च्या मुद्यावर ठाम रहा. अनोळखी व्यक्तीचे सहकार्य लाभेल. हाताखालील लोक विश्वासू मिळतील.



Post a Comment

0 Comments