क्रीडा विश्व हादरलं, रस्ते अपघातात आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा मृत्यूक्रिकेट विश्वाला हादरून सोडणारी एक घटना घडली आहे.अफगाणिस्तान संघाचा  सलामीवीर नजीबुल्लाह तारकाई  याचे आज सकाळी निधन झाले.काही दिवसांपूर्वी रस्ते अपघातात नजीबुल्लाह गंभीर जखमी झाला होता.पूर्व नंगरहारमध्ये रस्ता क्रॉस करत असताना एका गाडीने त्याला धडक दिली.गेल्या काही दिवसांपासून त्याची प्रकृती गंभीर होती,मात्र अफगाणिस्तान क्रिकेट बोडार्नं नजीबुल्लाहच्या निधनाची बातमी ट्वीट करत सांगितली.

२९ वर्षीय नजीबुल्लाह आयसीयूमध्ये होता. अपघातानंतर नजीबुल्लाह कोमात होता. त्याच्या डोक्याला मोठी दुखापत झाली होती आणि त्याच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यानच आज सकाळी त्याचा मृत्यू झाला.

Post a Comment

0 Comments