आई बापानेच बांधली तिची लगीन गाठ अन् थेट झाला गुन्हा दाखल....



मंगळवेडा/प्रतिनिधी:

मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगी येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह मंगळवेढा पोलीसानी रोखला आहे. यात मुलीच्या माता-पितासह चार जणाविरोध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालविवाह लावल्याप्रकरणी दत्तात्रय हरीबा इंगोले,कविता दत्तात्रय इंगोले,जालिंदर भोसले,किसनाबाई भोसले (रा.खुपसंगी) या चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवेढा तालुक्यातील गणेशवाडी येथील अल्पवयीन मुलगी आहे. हे माहिती असतानासुध्दा वडील दत्तात्रय इंगोले,आई कविता इंगोले व नातेवाईक जालिंदर भोसले ३ सप्टेंबर रोजी जालिंदर भोसले यांचे खुपसंगी येथील राहते घरासमोर बालविवाह लावल्यास तयार झाले. 

फिर्याद पोलिस नाईक अमर सुरवसे यांनी दाखल केल्यावर वरील चौघा आरोपीविरूध्द बालविवाह प्रतिबंधक कायदयानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा अधिक तपास पोलिस नाईक दत्तात्रय येलपले हे करीत आहेत.

Post a Comment

2 Comments