✒️डाॅ. लखन भोगम
सरचिटणीस, करवीर विधानसभा युवक काॅंग्रेस, कोल्हापुर
हजारो काॅंग्रेसनिष्ठ तरुणांना हक्काचे व्यासपीठ देणाय्रा महाराष्ट्राच्या नवनेतृत्वाचा अर्थात सत्यजीत दादांचा आज जन्मदिवस....
विद्यार्थी दशेपासूनच काॅंग्रेस पक्षाची ओढ होती, पण सप्टेंबर २०१८ मध्ये थेट युवक काॅंग्रेसच्या माध्यमातून सक्रिय झालो.
सप्टेंबर २०१८ ची महाराष्ट्र युवक काॅंग्रेसची निवडणूक हि लक्षवेधी निवडणूक होती... कारण, मे २०१४ नंतर महाराष्ट्रासह राष्ट्रीय राजकारणामध्ये काॅंग्रेस पक्षाची प्रचंड पिछेहाट झालेली होती... लोकसभे पाठोपाठ झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकीमध्येही काॅंग्रेस पक्षास दारुण पराभवास सामोरे जावे लागले... यातूनच, काॅंग्रेसचे अनेक बीनीचे शिलेदार भाजपा व इतर काॅंग्रसेत्तर पक्षामध्ये डेरेदाखल झालेले होते.
काॅंग्रेस पक्ष अत्यंत बिकट अशा अवस्थेतून जात असताना मा.सत्यजीत (दादा) तांबे यांनी मोठ्या साहसाने महाराष्ट्र प्रदेश युवक काॅंग्रेसची अध्यक्षपदाची निवडणूक लढवली व विजयी झाले.
काॅंग्रेस पक्ष संक्रमण अवस्थेत असताना राज्यपातळीवर पक्षाचे नेतृत्व करण्याचे धारीष्ठ सत्यजीत दादांनी दाखविल्यामुळे महाराष्ट्रासह देशभरातील काॅंग्रेस पाठीराख्यांच्या नजरा सत्यजीत दादांवर कामगिरीवर राहिल्या.
एनएसयुआई पासून कार्यकर्ता ते नेता अशी जडणघडण झालेल्या दादांनी अखंड महाराष्ट्राभर कार्यकर्त्यांचे व मित्रांचे एक वलय निर्माण केलेले होते.
जुन्या-नव्या युवा सहकाय्रांच्या मदतीने व वैयक्तिक कौशल्याच्या आधारे दादांनी अनेक कार्यक्षम तरुणांना युवक काॅंग्रेसच्या प्रवाहामध्ये आणले.
या युवकांच्या अंगातील उपजत क्षमतांचा शोध घेऊन त्यांच्यावरती वेगवेगळ्या जबाबदाय्रा सोपविल्या.
महाराष्ट्र प्रदेश युवक काॅंग्रेस, जिल्हा युवक काॅंग्रेस व विधानसभा युवक काॅंग्रेस या सर्वांमध्ये एकसुत्रता आणून महाराष्ट्रामध्ये काॅंग्रेस पक्षाची नियोजनबद्ध पुर्नबांधणी केली.
बहुचर्चित इंधन दरवाढ आंदोलना बरोबरच चलो पंचायत अभियान, परिवर्तन अभियान आणि सुपर ६० प्रोग्राम या महत्वकांक्षी उपक्रमाच्या माध्यमातून संपुर्ण राज्यभरात काॅंग्रेस पक्षास उर्जितावस्था मिळवून दिली.
महाराष्ट्र युवक काॅंग्रेचे विविध मोर्चे, आंदोलने, निवेदने, चलो पंचायत अभियान, परिवर्तन अभियान आणी सुपर ६० प्रोग्राम या सर्व उपक्रमांचा लाभ २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेस पक्षास झाला.
'Speak Up For Democracy' आणि 'कहॉ गए २० लाख करोड?' या सोशल मिडियावरील बहुचर्चित ट्रेंडसच्या माध्यमातून दादांनी सर्वसामान्य माणसांच्या भावना करोडो लोकांपर्यंत पोहचविल्या...
कृषीमूल्य व्यवस्थेतून पुढे आलेल्या व कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसणार्या माझ्यासारख्या हजारो काॅंग्रेसनिष्ठ तरुणांना दादांनी हक्काच राजकीय व्यासपीठ मिळवून दिल..
४ सप्टेंबर २०१८ रोजी सर्कीट हाऊस कोल्हापुर येथे दादांची व माझी पहिली भेट झाली..
यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान दादा एक वाक्य बोललेत व ते वाक्य माझ्या मनात कायमस्वरुपी खोलवर रुजल गेल.. ते म्हणजे “ महाराष्ट्र युवक काॅंग्रेसचा प्रत्येक उपक्रम मला मुव्हमेंट म्हणून राबवायचा आहे...इव्हेंट म्हणून नाही... कारण, इव्हेंट तात्पुरता बदल घडवतात व मुव्हमेंट कायमस्वरुपी बदल घडवतांत..”
तद् नंतरचे संपुर्ण संघटनात्मक कार्य हे दादांचे उपरोक्त विधान नजरेसमोर ठेऊनच पार पाडले.
दादांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली मला चलो पंचायत अभियान, परिवर्तन अभियान आणी सुपर ६० प्रोग्राम या उपक्रमांमध्ये स्थानिक पातळींवर आघाडीवर राहून कार्य करता आले.. याचा मला विशेष आनंद व अभिमान आहे....
पक्षाच्या विविध बैठका, सभा व व्यक्तिगत भेटीतून दांदांच्या एकंदर व्यक्तिमत्वामध्ये मला माझे राजकीय आदर्श स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू दिसून आले...
भविष्यात दादांचे नाव महाराष्ट्राच्या सर्वोच्च राजकीय पदावर कोरले जावे हिच सदिच्छा....!!!
आदरणीय दादांना जन्मदिनाच्या काॅंग्रेसमय शुभेच्छा.
शुभेच्छुक-
डाॅ. लखन भोगम
सरचिटणीस, करवीर विधानसभा युवक काॅंग्रेस, कोल्हापुर
📲 9049847575
2 Comments
Nice doctor bhogam sir
ReplyDeleteNice 👏👏👏
ReplyDelete