✒️ अनिकेत कांबळे
काल कुणीतरी मी माझ्या देशासाठी लिहिलेल्या संविधानावर धर्मनिरपेक्ष भारतामधल्या एका धर्माचा देव ठेवला.याबाबत तुम्ही लोकांनी जो निषेध केला याबद्दल मला काहीच वाटलं नाही.मुळात मी अस म्हणणार नाही की मी तुम्हाला या जातीच्या कचाट्यातून बाहेर काढलं.माझ्याही मागे लाखो रुपये पगाराची नोकरी होती मी सोडली.माझी चार लेकरं मी मारलीत.माझी रमा टाचा घासून मेली.मला अस्पृश्य म्हणून हिनवल,मी विदेशात गेलो.तिकडे थंडी जास्त म्हणे सगळे दारू पितात त्यासाठी,पण मी दारूच्या एका थेंबाला हात लावला नाही.माझ्याकडे कोट आला,टाय आला,बूट आला,रुबाब आला पण मी तुमच्या अडीच हजार वर्षाच्या नागडेपणाला बदलायला आलो पण तुम्ही मला संपवलं हो संपवलंच..!
माझा जयजयकार काय,माझ्या मिरवणुका काय हारतुरे Dj..दारू गुत्ता आणि पत्त्यांचे डाव काय..तुमच्या जातीत जन्माला आलो अभिमान असायला हवा.ना नाही माझी.पण हा कसला अभिमान.ह्या पोकळ बाता, सोशल मीडियावर पोकळ निषेध.संविधान मी लिहिलं असलं तरी ते सगळ्या देशाचं आहे.पण तुम्ही म्हंटला माझ्या बापाने लिहिलं.हा मान्य आहे,पण याच मुळे आज माझं संविधान सुद्धा महार जातीसाठीच लिहिलं आहे अस सहज कुणीही उठतोय म्हणतोय आणि तुम्ही लोकं या गोष्टीचा निषेध करून काय केलंत.ते संविधान ज्या लोकांनी संपवायचा कट रचलाय ते मोजताहेत तुम्हाला.
तुमच संविधान मी कुठल्याही धर्मावर जातीवर अन्याय होऊ न देता लिहिलंय.हे संविधान लिहिताना छत्रपती शिवाजी महाराज यांच स्वराज्य मी डोळ्यासमोर ठेवलं..छत्रपती शाहूंचा समतामुलक विचार मांडला..समता-बंधुता-न्याय यावर आधारित लिहिलंय.तुम्ही मला फक्त महारांचे डॉक्टर आंबेडकर म्हणून डोक्यावर मिरवलात मला.माज केला पण मला डोक्यात कधीच घेतला नाहीत.आज ज्यांनी ज्यांनी निषेध नोंदवला त्यातल्या एक टक्का सोडले तर कुणीच ते संविधान वाचलं नाही.आणि वाचलं तर सांगावं की हे संविधान मी फक्त माझ्या समाजासाठी लिहिलंय..कुठल्याही व्यक्तीची जीभ सुद्धा उचलणार नाही हे बोलताना..कारण त्याच्या सुरवातीला तुमचा बाबासाहेब तुम्हाला एका जातीत नाही तर एका देशात बांधायला जातोय...आम्ही भारताचे लोक..!शिका संघटित व्हा अन्यायाविरुद्ध संघर्ष करा ही माझी घोषणा फक्त तुम्ही संघर्ष या शब्दापुरता मर्यादित ठेवला..शिक्षण घेतलं नाही.संघटनेचे नेते एका बाजूला कार्यकर्ते दुसरीकडे..तुमचं एक धोरण नाही एक अजेंडा नाही.तुम्हीच माझा हा विचारांचा गाडा खूप मागे नेऊन ठेवलाय..हो तुम्हीच तुमचा बाबासाहेब संपवलाय...!
5 Comments
Such a very nice article "a brief review about "-The Great PersonallyS thoughts we all ignore & forgot what he told us"
ReplyDeleteThx Aniket ����
Thanks to you mam...This is real condition in our society..But Unfortunately some people ignore the message given by great epoch-making historians..We follow only Names not their work,mottos.
DeleteSuch a very nice article "a brief review about "-The Great PersonallyS thoughts we all ignore & forgot what he told us"
ReplyDeleteThx Aniket 👌👍
अतिशय आणि सुंदर शब्दात वर्णन
ReplyDeleteखूप आभारी आहे सर
Delete