सरपंच नितीन पाटील यांची एक्झिट माणसाला चटका लावणारी

बाजार भोगाव/प्रतिनिधी;


◆ पन्हाळा तालुक्यातील बाजार भोगाव चे सरपंच नितीन शामराव पाटील यांचे निधन अल्पशा आजराने झाले, अवघ्या ३८ वर्षी काळाने घाला घातला. बाजार भोगाव पहिले लोकनियुक्त सरपंच म्हणून त्यांची निवड झाली होती.  पक्षभेद विसरून सामान्य साठी काम करणारा कार्यकर्ता अशी भाऊंची पन्हाळा तालुक्यात ओळख होती.

◆ सर्वसामान्य लोकांना मदत हाच आपला धर्म समजून भाऊंनी हायात भर काम केले. ते उत्तम क्रिकेटपटू होते, त्याच्या जाण्याने पन्हाळा तालुक्यात दुःखाचे वातावरण आहे. ते पन्हाळा तालुक्यातील सरपंच संघटनेचे अध्यक्ष होते.

◆ आमदार विनय कोरे यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती, कोल्हापूर मधील राजकीय विश्वातून विविध माध्यमातून सरपंच नितिन पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. काहीही झालं तरी भाऊंची एक्झिट सर्वसामान्यांच्या मनाला चटका लावून जाते. काल रात्री ०२.३० च्या सुमारास काळाने घाला घातला.

Post a Comment

1 Comments

  1. भावपुर्ण श्रध्दांजली

    ReplyDelete