कोतोलीमधील नागरिकांची रोग प्रतिकारशक्ती वाढीवणारे कोरोना यौध्दे : डॉ.विशाल सावंत आणि डॉ.प्रवीण घुगरे



✒️अभिजीत विलास कोतोलीकर


कोरोनाच्या महामारीत आरोग्याच्या दृष्टीने सर्वच स्तरावर काळजी घेतली जात आहे. शासनाने सांगितलेल्या उपायजोजना प्रत्येकजण आपल्यापरीने अंमलात आणून स्वतःची आणि कुटूंबाची काळजी घेत आहे. काही घरगुती उपाय प्रत्येकजण घरी करीत आहे. पण या पार्श्वभूमीवर नागरिकांची रोग प्रतिकार शक्ती वाढली पाहिजे, तरच सामान्य माणूस कोरोनाचा सामना यशस्वीपणे करू शकेल हीच सामन्यांची गरज ओळखुन गावातील एक होमिओपॅथी युवा डॉक्टर पूढे आला. तो युवा डॉक्टर म्हणजे "डॉ.विशाल सावंत" आणि या युवा डॉक्टरला गावातीलच अनुभवी अशा "डॉ.प्रवीण घुगरे" यांनी त्याला साथ दिली. या जोडीमधील डॉ. विशाल यांनी पुण्याच्या नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात MD पर्यंतच शिक्षण पूर्ण केले. पुढे काही काळ पुण्यातील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी प्रॅक्टिस केली. पण इथे काही मन रमेना म्हणून कोतोली या आपल्या मूळ गावी येऊन प्रॅक्टिस सुरू केली. MD पर्यंतचं शिक्षण घेऊन गावात होमिओपॅथीमध्ये प्रॅक्टिस करणारा हा पहिलाच युवा डॉक्टर. ग्रामीण भागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या असाध्य आजारावर होमिओपॅथीच्या उपचारांचा फायदा व्हावा, त्यांना लवकरच या व्याधीतुन मुक्तता मिळावी म्हणून सुरू केलेल्या, अगदी माफक दरात तसेच गरजूंना मोफत उपचार देणाऱ्या "राफा होमिओपॅथीने" अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

 आपली वैदयकीय प्रॅक्टिस सुरळीत सुरू असतानाच संपूर्ण देशावर आलेल्या कोरोनाच्या संकटात गावातील नागरिकांच्या आरोग्यासाठी काही तर केलं पाहिजे, नागरिकांना कोरोनाचा सामना करण्यासाठी सक्षम केले पाहिजे हा विचार मनात येताच गावातील नागरिकांची रोग प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून या युवा डॉक्टरांने गावातील नागरिकांना "आर्सेनिक अल्बम ३०" या  होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप करण्याचा ध्यास घेतला.आपला हा विचार सरपंच प्रकाश पाटील, डॉ.प्रवीण घुगरे व दक्षता समितीसमोर व्यक्त करताच क्षणाचाही विचार न करता सर्वांनी या उपक्रमाचे कौतुक केले व तात्काळ आपली सहमती दर्शवत यात सहभाग घेतला. आणि गावातील प्रत्येक कुटूंबाला आर्सेनिक अल्बम ३०" गोळ्या वाटण्याचा प्रवास सुरू झाला. कोतोली, मानेवाडी आणि भाचरवाडी या गावातील प्रत्येक कुटूंबाला पर्यंत "आर्सेनिक अल्बम ३०" गोळ्यां पोहचविण्यात आल्या. कोतोलीमधील जवळपास 1200 कुटुंब, मानेवाडी 100, आणि भाचरवाडीमधील 200 कुटूंबापर्यंत या गोळ्या पोहचविण्यात आल्या. मधल्या काळात "आर्सेनिक अल्बम ३०"बाबत व्यापक प्रमाणात जनजागृती झाल्याने गोळ्यांचा तुटवडा पडला परंतु डॉ. विशाल यांनी आपल्या पुण्यातील काही सहकार्याच्या मदतीने तात्काळ गोळ्या उपलब्ध करून गावातील प्रत्येक कुटूंबापर्यंत गोळ्या पोहचविल्या.
    
याकामात त्यांना मोलाची साथ दिली ते डॉ.प्रवीण घुगरे यांनी, डॉ.घुगरे हे गेली अनेक वर्षे कोतोलीमध्ये प्रॅक्टिस करत आहेत. परिसरातील अनेक रुग्ण त्यांच्याकडे उपचार घेतात. एक यशस्वी डॉक्टर म्हणून गेली अनेक वर्ष ते अविरतपणे सेवा देत आहेत. रुग्ण सेवेबरोबरच सामाजिक कार्याची विशेष आवड असणारे डॉ.घुगरे गावातील विविध सामाजिक कार्यात सक्रिय असतात. गावातील नागरिकांची रोग प्रतिकार शक्ती वाढावी म्हणून "आर्सेनिक अल्बम ३०" गोळ्या वाटण्यात यांचा मोलाचा वाटा आहे. गोळ्या वाटण्यासोबतच यासाठी लागणारी आर्थिक बाजू यांनी सक्षमपणे पेलली.
    
या दोन्ही डॉक्टरांनी गोळ्या देण्यासोबतच त्या घेण्याची पद्धती देखील प्रत्येक नागरिकांना अत्यंत प्रभावीपणे सांगितल्या. कोतोली गावचची लोकसंख्या बघता वेळेत सर्व गोळ्या नागरिकांपर्यंत पोहचविणे गरजेचे होते. या सर्व उपलब्ध गोळ्या नागरिकांपर्यंत पोहचविण्याचं शिवधनुष्य पेललं ते म्हणजे गावचे लोकनियुक्त सरपंच श्री. प्रकाश पाटील आणि त्यांच्या दक्षता समितीमधील सहकार्यानी.आपल्या गावातील प्रत्येक नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे या उदान्त हेतूने दक्षता समितीमधील सर्व सदस्यांनी या गोळ्या गावतील प्रत्येक कुटूंबापर्यंत पोहचविल्या.

   कोरोनाच्या जागतिक महामारीत सर्वच डॉक्टर्स, नर्स, मेडिकल स्टाफ आपल्या जीवाची बाजी लावून काम करत आहेत. कोतोलीमधील डॉ. विशाल सावंत व डॉ.प्रवीण घुगरे यांनी गावतील नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी सामाजिक भावनेनं "आर्सेनिक अल्बम ३०" गोळ्यांचे वाटप करून नागरिकांची रोग प्रतिकारशक्ती वाढण्याचे मोलाचा कार्य केले आहे. कोतोलीमधील या दोन डॉक्टर कोरोना योद्धाच्या निस्वार्थी, समाजोपयोगी कार्याला सलाम ।। त्यांच्या पुढील सर्व वैद्यकीय व सामाजिक कार्यास मनस्वी शुभेच्छा।।।

माझा गावं। माझा अभिमान।।

Post a Comment

9 Comments

  1. Very good... डॉक्टर विशाल सर आणि प्रवीण सर यांचे अभिनंदन!! अभी.. छान शब्दांकन.!

    ReplyDelete
  2. Very good... डॉक्टर विशाल सर आणि प्रवीण सर यांचे अभिनंदन!! अभी.. छान शब्दांकन.!

    ReplyDelete
  3. Very good... डॉक्टर विशाल सर आणि प्रवीण सर यांचे अभिनंदन!! अभी.. छान शब्दांकन.!

    ReplyDelete
  4. आपल्या सर्वांचे आभार..
    🙏🏻🙏🏻

    ReplyDelete