कोरोनाच्या जागतिक प्रशासनातील सर्व यंत्रणा वेगाने काम करत आहेत. आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन,विविध शासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी सर्वजण कोरोना विरुध्द लढा देत आहे. देशातील सर्वच डॉक्टरांनी यात प्रमुख भूमिका बजावली आहे. डॉक्टरी पेशा हा उत्तम वैद्यकिय व्यवसाय असला तरी कोतोलीमधील एका डॉक्टर कुटुंबाने या व्यवसायाला समाजकार्याची जोड दिली आहे. ते म्हणजे "डॉ .सुभाष सूर्यकांत चौगुले." BHMS चे वैद्यकीय शिक्षण घेतेलेले डॉ. चौगुले यांची कोतोली मध्ये उत्तम प्रॅक्टिस सुरू आहे. मुळातच शिक्षक वडिलांकडून चांगले संस्कार झालेल्या डॉ. चौगुले यांनी आपली ओळख फ़क्त उत्तम डॉक्टर म्हणून न ठेवता कोतोली आणि परिसरातील गरजूंना मदत करणारा एक सामाजिक, सामान्य कार्यकर्ता म्हणून देखील निर्माण केली आहे.
कोरोना या विषाणूने जगभर थैमान घातले आहे. प्रशासनाने नागरिकांमध्ये याबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती केली आहे. मास्क वापरणे, सॅनिटाझरचा वापर करणे, सामाजिक अंतर पाळणे अशा मूलभूत गोष्टी विविध माध्यमातून नागरिकांपर्यत पोहचविल्या आहेत. याच गोष्टीचा खोलवर विचार करून डॉक्टर सुभाष चौगुले यांनी कोतोली गावातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने एक पाऊल उचलले ते म्हणजे गावातील प्रत्येक कुटूंबाला त्यांनी स्व:खर्चातून दक्षता समितीच्या सहकार्याने सॅनिटाझरच्या बॉटल देऊन स्वच्छतेचा व चांगल्या आरोग्याचा संदेश घरोघरी दिला.
कोतोली,मानेवाडी, भाचरवाडी या गावातील कुटूंबाना सुमारे 1300 बॉटल सॅनिटाझर घरोघरी पोहचविले. जवळपास 300 लिटर सॅनिटाझर त्यांनी नागरिकांपर्यत पोहचविले. इतकेच नाही तर गावातील तसेच परिसरातील गरजू लोकांना त्यांनी धान्य व वस्तूचे वाटप केले. जवळपास 100 किलो गहू ,100 किलो तांदूळ, 20 लिटर खाद्यतेल, 10 किलो तांदूळ इत्यादी सामान त्यांनी गरजूंना दिले. या संपूर्ण कार्यात त्यांना त्यांच्या पत्नी डॉ.कौशल्या सुभाष चौगुले, लहान बंधू प्रदीप चौगुले, संपूर्ण चौगुले कुटूंब तसेच सरपंच प्रकाश पाटील(PM) यांच्यासह संपूर्ण दक्षता समितीच्या सदस्यांनी मोलाची मदत केली. सरपंच प्रकाश पाटील आणि दक्षता समितीच्या सदस्यांनी आपला अमूल्य वेळ खर्च करत गावातील प्रत्येक कुटूंबापर्यत हे सॅनिटाझर पोहचविले.
कोणताही स्वार्थ मनात न ठेवता, प्रसिद्धीचा आव न आणता चौगुले कुटूंब अखंडपणे सामाजिक बांधिलकी जपत आहेत. कोरोनाच्या महामारीत प्रत्येक कुटूंबापर्यत सॅनिटाझर पोहच करून एका योद्धाप्रमाणे डॉ. सुभाष चौगुले यांनी गावातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली आहे. अशा या कोरोना योद्धाच्या कार्याला सलाम।। त्यांच्या पुढील सर्व सामाजिक कार्यास मनस्वी शुभेच्छा।।।💐💐
माझा गावं। माझा अभिमान।।
✒️
अभिजीत विलास कोतोलीकर
4 Comments
मांडणी अप्रतिम आहे. अभिजीत असाच लिहीत जा. तुझ्या लेखणिची छाप अशीच उमटत राहूदे
ReplyDeleteमांडणी अप्रतिम आहे. अभिजीत असाच लिहीत जा. तुझ्या लेखणिची छाप अशीच उमटत राहूदे
ReplyDeleteसलाम त्यांच्या कार्याला... अशी लोक फार कमी असतात जी निस्वार्थ पणे कार्य करीत असतात.
ReplyDeleteखूप छान काम केले डॉक्टर साहेबांनी
ReplyDeleteअसेच कार्य कायम आपल्या हातून घडत राहोत