बार्शी हादरली: बेकायदेशीर लिंग निदान आणि असुरक्षित गर्भपातामुळे २८ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल



 सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पोटातील बाळ मुलगा आहे की मुलगी हे तपासण्यासाठी केलेले बेकायदेशीर लिंग निदान आणि त्यानंतर केलेल्या असुरक्षित गर्भपातामुळे वृषाली वैभव मोरे (वय २८, रा. श्रीपत पिंपरी,) या विवाहितेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी बार्शी तालुका पोलिसांनी मुख्य सूत्रधार विकास पवारसह तिघांविरुद्ध मुन्ना दाखल केला आहे.

मृत विवाहिता वृषाली मोरे ही सुशिक्षित (Pharmacy) असून ती सध्या आपल्या माहेरी श्रीपत पिंपरी येथे आली होती. १ डिसेंबर २०२५ रोजी तिने देवदर्शनाचे निमित्त काढून आई-वडिलांसोबत पंढरपूर गाठले. तेथे तिने आरोपी विकास पवार याच्याशी संपर्क साधला. ज्याने एका पुरुष आणि एका महिलेच्या मदतीने वृषालीची बेकायदेशीर सोनोग्राफी केली. पोटात मुलगी आहे असे सांगून आरोपीनी या तपासणीसाठी वृषालीकडून २०,००० रुपये रोख घेतली.

लिंग निदानानंतर, विकास पवारच्या सांगण्यावरून १२ डिसेंबर २०२५ रोजी एक पुरुष (बोलेरो चालक) आणि एक अनोळखी महिला पहिन्या रंशाच्या बोलेरो गाडीतून श्रीपतविपती येथे वृषालीच्या घरी पोहोचले. त्यांनी वृषालीला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. या कामासाठी वृषालीने आपल्या भावाच्या मोबाईलवरून आरोपींना २५००० रुपये ऑनलाईन पाठवले होते. हे औषध घेतल्यावर वृषालीला प्रचंड त्रास होऊ लागला आणि रक्तस्राव सुरू झाला.

Post a Comment

0 Comments