धाराशिव |
गेल्या महिन्यातील एका दुर्दैवी रस्ता अपघातात एक वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. घटनेनुसार, दिनांक २८ जुलै २०२५ रोजी संध्याकाळी सहा ते साडेसातच्या दरम्यान पुतळाबाई वसंत कांबळे (वय ६५, लहुजी नगर, वाशी) ह्या प्राजक्ता हॉटेलसमोर, वाशी फाटा ते वाशी या रस्त्यावर पायी चालत होत्या. त्यावेळी, अमीत सुनित गाडे (वाशी) या चालकाने हायगती व निष्काळजीपणे चालविलेल्या मोटारसायकल (एमएच २५ व्ही ८३२७) ने त्यांना पाठीमागून धडक मारली. या अपघातात कांबळे या गंभीर जखमी झाल्या व नंतर त्यांचा मृत्यू झाला.
मृत महिलेच्या जावई सुखदेव वसंत कांबळे (वय ४३) यांनी वाशी पोलीस ठाण्यात दिनांक २३ ऑगस्ट रोजी तक्रादी नोंदवली. त्यावरून पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम २८१ (राजमार्गावर बेकायदेशीर रीत्या वाहन चालवणे), १०६(१) (दुर्लक्षाने किंवा बेपर्वाईने कृती केल्याने मृत्यू होणे) तसेच मोटर वाहन अधिनियमाच्या कलम १८४ (धोकादायक रीतीने वाहन चालवणे) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. सध्या आरोपी अमीत गाडेवर खटला भरण्यात आला असून, पोलिस तपास करीत आहेत.
0 Comments