करमाळा |
करमाळा तालुक्यातील कोर्टी येथे पत्नीचा गळा दाबून खून करून स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. युवराज लक्ष्मण शेरे (वय ३१) व रूपाली युवराज शेरे (वय २५) असे मृत पती-पत्नीचे नाव आहे. तो सतत पत्नीला चिडचिड करत होता, कुटुंबियांना देखील तो मागील दोन महिन्यापासून व्यवस्थित बोलत नव्हता. टेन्शनमध्ये युवराजने टोकाचा निर्णय घेतला आणि साडेचार महिन्याच्या चिमुकलीसमोरच पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर स्वतःलाही संपविले, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मयत युवराज शेरे हा पत्नी आई वडील,भाऊ, भावजय लहान मुलीसह कोर्टी येथील हुलगेवाडी रस्त्यावरील शेरे वस्ती येथे राहायला होता. युवराज शेरे व त्यांची पत्नी रूपाली असे दोघेच घरी होते. घरात कोणीही नसल्याने युवराजने पत्नी रूपालीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर आपल्या हातून होत्याचे नव्हते झाल्याच्या पश्चातापातून युवराजने देखील स्वतः घरातील अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.
त्याच दिवशी सायंकाळी साडेपाच सहाच्या सुमारास कामानिमित्त बाहेर गेलेली कुटुंबातील इतर लोक घरी आली. त्यावेळी चिमुकली बंद घरात रडत होती. त्यावेळी युवराजच्या वडिलांनी दरवाजा तोडून आता प्रवेश केला. तेव्हा सून रूपाली निपचित पडली होती आणि युवराज लोखंडी अँगलला लटकत असल्याचे दिसले. त्यांनी युवराजला खाली उतरविले आणि पोलिसांना केली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले, पोलिसांनी मतदेह उत्तरीय तपासणीसाठी सरकारी दवाखान्यात पाठविले.पोलिस निरीक्षक विनोद घुगे याबाबतचा अधिक तपास करत आहेत.
0 Comments