परंडा मतदारसंघात तानाजी सावंत बाजी मारणार की तुतारी विजयापर्यंत पोहोचणार ?


परंडा |

परंडा मतदारसंघातून 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मंत्री तानाजी सावंत यांनी विजय मिळवला होता. तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवारांचे नातेवाईक असलेल्या राहुल मोटे यांना पराभूत केले होते. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर ते शिंदे सेनेसॊबत गेले. सध्या ते राज्याचे आरोग्यमंत्री आहेत.

येत्या काळात महायुतीकडून तानाजी सावंत हेच उमेदवार असण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीत जागा कोणाच्या वाट्याला येणार यावरून उमेदवार ठरणार आहे. 2019 च्या निवडणुकीत सेनेचे आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी तानाजी सावंत यांना साथ दिली होती.

 आता माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, शंकर बोरकर शिवसेना ठाकरे गटाकडून इच्छुक आहेत. तर शरद पवार गटाकडून माजी आमदार राहुल मोटेही इच्छुक आहेत. या ठिकाणी लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला 80 हजार मताची आघाडी आहे. त्यामुळे ती जागा कोणाला सुटणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Post a Comment

0 Comments