आजकाल वाढत्या स्ट्रेसमुळे शरीराबरोबर मानसिक आरोग्याची देखील काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. बऱ्याचदा आपण शरीराची काळजी घेतो. मानसिक आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करतो. हल्ली बरेचजण मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी व्यायामासोबत मेडिटेशनचाही आधार घेण्यात येतो. मेडिटेशन केल्याने मन आणि शरीर दोन्ही रिलॅक्स होतात. पण, असे असले तरी आपण किती वेळ मेडिटेशन केले पाहिजे किंवा मेडिटेशन करण्याची योग्य वेळ कोणती आहे. हे तुम्हाला ठाऊक आहे का? जाणून घेऊयात
मेडिटेशन करण्यासाठी योग्य वेळ –
तुमच्या वैयक्तिक आवडीनुसार किंवा तुम्हाला जी वेळ योग्य वाटेल तुमच्या वेळापत्रकानुसार तुम्ही मेडिटेशन करू शकता.
अनेकांना सकाळी उठल्यानंतर मेडिटेशन करणे सोयीचे वाटते कारण याने दिवसाची सुरुवात उत्तम होते आणि प्रसन्न वाटते.
संध्याकाळी कामकाज संपल्यानंतर मेडिटेशन करणेही फायदेशीर ठरू शकते. यामुळे मन शांत होते आणि दिवसभराचा ताण कमी होतो.
किती वेळ मेडिटेशन करावे?
सुरूवातीला मेडिटेशन जास्त वेळ करू नये. केवळ 5 -10मिनिटे मेडिटेशन करणे पुरेसे असते. जर तुम्हाला दररोज मेडिटेशन करायची सवय असेल तर 30 मिनिटे किंवा त्यापेक्षा जास्त वेळ मेडिटेशन करणे फायद्याचे ठरेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मेडिटेशन नियमित करणे गरजेचे असते. कमी वेळ असेल तर 10 मिनिटे तरी मेडिटेशन करावे.
0 Comments