बार्शीच्या जावयाला सासूने बोलून घेतले, सासर्‍याने जावयाचे डोके फोडले


बार्शी |

सासुरवाडीला आलेल्या जावयाचा सासरवाडीत चांगली सरबराई केली जाते. एका जावयाला त्याच्या सासूने फोन करून बोलाविले आणि सासऱ्याने चक्क जावयाच्या डोक्यात दगड घालून त्याचे डोके फोडले. अनिल परमेश्वर मेंगडे (रा. बार्शी) असे या जावयाचे नाव आहे.

आपल्या सासूने फोन करून बोलावून घेतल्याने अनिल हा सोमवारी (दि.१५) सकाळी ११:३० वाजता पत्नी व मुलांसह टाकळी फाटा येथे आपल्या सासरवाडीला गेला. तो घरी गेल्यानंतर त्याचे सासरे तुळशीराम दत्तु कदम हे त्याला म्हणाले, तुम्ही माझ्या घरी माझ्या मुलीला व नातवंडाला का घेऊन आलात? तेव्हा सासूने फोन करून पत्नीसह या म्हटल्याचे अनिल सांगताच सासऱ्याने जावाई अनिलला शिवीगाळ केली. शिवीगाळ करू नका, असे अनिल म्हणताच सासऱ्याने अनिलच्या डोक्यात दगड मारून अनिलचे डोके फोडले.त्यानंतर पुन्हा सासरवाडीला आलास तर मारून टाकेन, अशी धमकीही दिली. त्यानंतर जावाई अनिल याने केज पोलिस ठाण्यात धाव घेत सासऱ्याविरूद्धात तक्रार दाखल केली.

Post a Comment

0 Comments