“स्वार्थी जगात आपली मैत्री दृष्ट लागण्यासारखी…”, प्रितम मुंडेंची रक्षा खडसेंसाठी भावनिक पोस्ट चर्चेत


राजकारणात कोणी कोणाचा मित्र आणि कोणीच कोणाचा शत्रू नसतो, जे काही असतं ते फार थोड्या काळासाठी असतं असं आपण अनेक नेत्यांच्या मंत्र्यांच्या तोंडून ऐकलं असेल. मात्र आता भाजपच्या दोन महिला नेत्या आहेत. त्या एकमेकींच्या जिवलग आहेत असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. एवढ्या स्वार्थी जगात आपली मैत्री दृष्ट लागण्यासारखी आहे, असा उल्लेख भाजपच्या बीडच्या माजी खासदार प्रितम मुंडे यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये केला आहे.

रक्षा खडसे यांना नुकतच मंत्रीपद देण्यात आलं. त्यावेळी ठिकठिकाणी रक्षा खडसे या आपली मैत्रीण म्हणजे प्रितम मुंडेंसाठी भावूक झाल्याचं दिसून आलं आहे. प्रितम मुंडे आता संसदेत नसतील म्हणून मला रडू आलं. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. त्यानंतर आता प्रितम मुंडे यांनी पोस्ट करत रक्षा खडसे शुभेच्छा दिल्या आहेत. यावर आता प्रितम मुंडे यांनी रक्षा खडसेंवर एक भावूक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

प्रितम मुंडेंची पोस्ट व्हायरल
10 वर्ष ही खूप काही देऊन गेली, बहुतेक चांगलंच. मंत्रिपदावर विराजमान झाल्यानंतर जल्लोष साजरा करण्यापेक्षा आपली मैत्रीण संसदेत नाही म्हणून गहिवरून येणारी तू ! रक्षा आजच्या एवढ्या स्वार्थी जगात आपली मैत्री दृष्ट लागण्यासारखीच आहे. पक्षातील निवडणूक निरीक्षकांना एकमेकांच्या शिफारसी करणाऱ्या, स्वतःच तिकीट जाहीर झालं की नाही यापेक्षा मैत्रिणीचं तर झालं न हे बघणाऱ्या, निकालाच्या दिवशी स्वतःचे उतार चढाव हाताळताना देखील एक नजर कायम दुसरीच्या निकालाकडे ठेवणाऱ्या. 10 वर्ष सतत संसदेत शेजारी बसणाऱ्या, पक्षाच्या बैठकांना एकत्रच जाणाऱ्या, दिल्लीत एकाच मजल्यावर राहणाऱ्या, एकमेकींना राजकीय घटनांपासून कपड्यांच्या रंगसंगतींपर्यंत सल्ले देणाऱ्या आपण संसदेतली विधेयकांची चर्चा करणाऱ्या आपण, अनेक देवदर्शनांना देखील एकत्रच गेलो, असं प्रितम मुंडेंनी म्हटलं.

10 वर्षातला प्रवास तुमच्या सगळ्यांच्याच सोबतीने खूप छान झाला, पण तुझं स्थान माझ्या आयुष्यात खास होत आणि नेहमी राहील. आजच्या या स्वार्थी जगात निस्वार्थ मैत्री जपणारी माझी मैत्रीण रक्षा तुला या यशाच्या कोटी कोटी शुभेच्छा आणि तुझ्या हातून आजपर्यंत घडलं तसंच चांगलं कार्य घडो, सतत लोकसेवा तुझ्या हातून घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

दरम्यान, रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसे यांना पुन्हा एकदा भाजपने उमेदवारी दिली होती. तर त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातून श्रीराम पाटील यांच्यात लढत झाली. या लोकसभेच्या लढतीत रक्षा खडसे या भरघोस माताने विजयी झाल्या असल्याची माहिती आता समोर आली आहे.

त्यानंतर राज्यातून दोन खासदारांना मंत्रीपद दिलं गेलं आहे. पुणे लोकसभा मतदारसंघाचे मुरलीधर मोहोळ यांना मंत्रीपद दिलं गेलं. त्यानंतर रक्षा खडसेंना मंत्रीपद दिलं गेलं आहे.

Post a Comment

0 Comments