वायनाड पोटनिवडणूक प्रियांका गांधी लढवणार? राहुल गांधींनी दिले संकेत


नवी दिल्ली |

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील रायबरेली तसेच केरळमधील वायनाडची जागेवर विजय मिळवला. त्यानंतर आता त्यांना एका जगावर राजीनामा द्यावा लागणार आहे. कारण, एकाच वेळी दोन्ही जागांवर खासदार होऊ शकत नाहीत. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिलेल्या जागेवर पोटनिवडणूक घेऊन नवीन खासदार निवडण्यात येणार आहे. त्यामुळे आता राहुल गांधी हे कोणत्या जागेवर राजीनामा देणार याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. राहुल गांधी हे वायनाडची जागा सोडणार असून त्यांच्या ऐवजी प्रियांका गांधींना संधी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. 

राहुल गांधी कोणत्या जागेवर कायम राहणार आणि कोणत्या जागेवर राजीनामा याबाबत अनेक चर्चा रंगल्या. तसेच, राहुल गांधींच्या जागेवर प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगल्या आहेत. 2019च्या लोकसभा निवडणुकीपासून प्रियांका गांधी निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे. 

त्यावेळीही ती वाराणसीतुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देऊ शकतात, अशी चर्चा होती. त्यानंतर 2022 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुक त्या लढवणार असल्याची चर्चा होती. त्या निवडणुकीमध्ये त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारीच्या बऱ्याच चर्चा झाल्या. त्यानंतर 2024 मध्ये जेव्हा सोनिया गांधी यांनी रायबरेलीची जागा सोडली, तेव्हा प्रियांका गांधींचे नाव पुन्हा चर्चेत होते. पण त्यानंतर राहुल गांधी यांनी या जागेवरून निवडणूक लढवली आणि विजयी झाले.

Post a Comment

0 Comments