महिलांच्या शर्टाची बटण डाव्या तर पुरुषांची उजव्या बाजूला का असतात? 99 टक्के लोकांना माहित नसेल कारण


सध्या महिला आणि पुरुष यांच्या कपड्यातील फॅशनमध्ये फारसे अंतर राहिले नाही. महिला आणि पुरुष हे दोन्ही सुद्धा शर्ट वापरतात. त्यांच्या शर्टाचा रंग, डिझाईन आणि साईज इत्यादी गोष्टी जरी एकसारख्या असल्या तरी त्याची दोघांच्या शर्टची बटण मात्र वेगवेगळ्या दिशेला उघडतात. मात्र यामागचं नेमकं कारण अनेकांना ठाऊक नसतं.

महिलांच्या शर्टची बटण ही डाव्या बाजूला आणि पुरुषांच्या शर्टाची बटण ही उजव्या बाजूला का असतात याबाबत कोरा या साईटवर काही यूजर्सनी उत्तर दिली आहेत. अनेकदा महिला बाळांना दूध पाजताना त्यांना डाव्या हाताने पकडतात जेणेकरून उजव्या हाताने ते आपले कपडे सांभाळू शकतात. महिलांना सोईस्कर पडावं म्हणून त्यांनी डाव्या बाजूला बटण लावण्यास सुरुवात केली.

पूर्वीच्या काळात पुरुषांना लढाईला जावे लागायचे. अधिकतर पुरुष तेव्हा डाव्या हातात तलवार पकडायचे त्याने आपल्याला सोईस्कर पडावं म्हणून त्यांनी उजव्या बाजूला बटण लावण्यास सुरुवात केली. त्यामुळे पुरुषांच्या शर्टाची बटण ही उजव्या बाजूला असतात असं म्हंटल जात.

कोरावर एका युझरने लिहिलेल्या थिअरीनुसार, फ्रांसचा सम्राट नेपोलियन याला शर्टाच्या उजव्या बाजूस हात घालून वावरण्याची सवय होती. नेपोलियनची स्टाईल कॉपी करत त्यावेळच्या अनेक महिलांनी उजव्या बाजूला उघडणारी बटण घालायला सुरुवात केली. तेव्हा नेपोलियनने आदेश दिला की सर्व महिलांनी आपल्या शर्टाची बटण ही डाव्या बाजूला लावावीत. तिथपासून महिला या उजव्या बाजूला बटण असणारे शर्ट वापरू लागल्या असे म्हंटले जाते.

असं म्हंटल जातं की जेव्हा महिलांसाठी शर्टची फॅशन आली तेव्हा केवळ श्रीमंत स्त्रिया शर्ट घालायच्या. अशा महिलांना तयार करण्यासाठी त्यांच्याकडे मदतनीस असायच्या. तेव्हा त्यांना उजव्या हाताने उलटे बटण लावता आले पाहिजे. याउद्देशाने महिलांच्या शर्टाची बटण ही डाव्या बाजूला असायची.

Post a Comment

0 Comments