रजेवर असताना महिला अधिकाऱ्यांनी घेतली दीड लाखाची लाच



नाशिक |

नाशिकच्या पुरातत्व विभागात सहाय्यक संचालक पदावर असलेली महिला अधिकारी प्रसूतीच्या  सुटीवर असताना ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी दीड लाख रुपयांची मागणी  केली. तक्रारदाराकडून ही रक्कम स्वीकारल्याने नाशिकच्या इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकच्या पुरातत्व विभागात सहाय्यक संचालक आरती आळे असे या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. त्या सरकार वाड्यामध्ये कार्यरत आहेत. आरती आळे मागील १०- १२ दिवसांपासून प्रसुती रजेवर आहेत. रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी कंपनी सुरू करण्यासाठी पुरातत्व विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक होते. हे प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात दीड लाखाची लाच स्वीकारण्यात आली होती.

सदरची रक्कम स्वीकारणाऱ्या पुरातत्त्व विभागाच्या सहाय्यक संचालक आरती आळे आणि तेजस गर्गे या दोघांच्या विरोधात लाचेचा गुन्हा इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल झाला.

Post a Comment

0 Comments