येरमाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील नर्स अंजना गोरोबा पवार यांच्या स्कुटीला सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात ट्रकने मागून धडक दिल्याने या अपघातात त्या जागीच ठार झाल्याची घटना घडली.
येडशी, ता. धाराशिव येथील रहिवासी येरमाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या चोराखळीच्या उपकेंद्राच्या नर्स अंजना गोरोबा पवार (वय-३२) आज आपल्या ऍक्टिवा स्कुटी क्र. एम.एच.२५ऐ. यु.४२८९ वरुन येडशीकडे जात असताना येरमाळा येथून जवळच असलेल्या ज्ञानोद्योग उच्चमाध्यमिक विद्यालयाजवळ राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात ट्रकने मागून धडक दिल्याने त्या या अपघातात जागीच ठार झाल्या. रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी त्यांना ओळखल्याने सदरील प्रकार उघडकीस आला.
त्या येडशी येथील रहिवासी होत्या. तसेच येरमाळा येथील पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस कॉन्स्टेबल किरण सूर्यकांत शिंदे यांच्या पत्नी होत्या. ते दोघे प्राथमिक आरोग्य केंद्रातील क्वार्टरमध्ये राहत होते.
आज गावाकडे जात असताना ऐन अक्षय तुतीया सना दिवशी ही घटना घडल्याने हळ हळ व्यक्त केली जात असुन या घटनेची माहिती मिळताच येडशी गावावर शोककळा पसरली. अंजना पवार यांच्या पाश्चात पती, मुलगा, मुलगी, सासू-सासरे असा परिवार आहे.
0 Comments