मुंबई |
महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवारांचे, काँग्रेसच आव्हान मोडीत काढण्यासाठी भारतीय जनता पक्षाने,विशेषत: पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहांनी मनसेचे राज ठाकरेंना जवळ घेऊन नवीन समीकरण जुळवले.
या समीकरणामुळे मुंबईती ठाकरेंना मानणारांना मतदार भाजपकडे वळेल, असे आराखडे बांधले गेले. त्यातूनच मुंबईतील मोदींच्या सभेत खास मान देऊन दिला. आणि राज ठाकरेंनीही मोदींच्या डोळ्या देखत जोरदार भाषण ठोकले. राज ठाकरेंच्या भाषणानंतर काही क्षणात मोदींचे भाषण सुरु झाले. मात्र मनसे, शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी पॅकअप केले अर्थात हळूहळू मनसे, शिंदेचे कार्यकर्ते सभास्थळावरू निघून गेले.
परिणामी मोदी आणि राज ठाकरे, एकनाथ शिंदेंच्या सभेमुळे एकत्र आलेल्या कार्यकर्त्यांनी मोदींच्या भाषणावेळी काढता पाय घेतला. याची चर्चा जोरदार झाली. त्यामुळे मोदींची सभा राज ठाकरेंचा पाठींबा शिंदेचे शक्तिप्रदर्शन तोंडदेखलेपणा होता का? असा सवाल देखील केला गेला.
0 Comments