“…म्हणून आम्ही राज ठाकरेंना सोबत घेतलं”; मोदींनी सांगितलं कारण


गुढीपाडवा मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्याआधी राज ठाकरे आणि अमित शहा यांच्या भेटीनंतर काय होईल? याकडे अनेकांच्या नजरा खिळल्या होत्या. अखेर काही दिवसानंतर राज ठाकरे यांनी महायुतीसोबत जाण्याबाबत हिरवा कंदील दाखवला.

राज ठाकरे आता महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार करताना दिसत आहेत. दरम्यान ईडी आणि सीबीआय़चा वापर करून भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फोडल्याचा आरोप विरोधक करताना दिसत आहेत. यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करत भाजपसोबत हात मिळवणी केली. त्यानंतर आता राज ठाकरे देखील भाजपसोबत गेले आहेत.

याआधी राज ठाकरे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सूर होता. ते अनेक ठिकाणी सभा घेत नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका करताना दिसत होते. मात्र असं काय झालं की त्यानंतर राज ठाकरे हे अचानक केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या भेटीला गेले. त्यानंतर भाजपने बेरजेची गणितं आखली आणि भाजपला यश मिळालं. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाजपला अशी का गरज लागली की त्यांना आपल्यासोबत राज ठाकरे यांना घ्यावं लागलं? यावर आता मोदींनी उत्तर दिलं.

राज ठाकरे यांना सोबत का घेतलं?
नरेंद्र मोदींना एका मुलाखतीत बोलत असताना त्यांना प्रश्न करण्यात आला की, एवढी विजयाची खात्री होती तरीही राज ठाकरे यांना सोबत का घेतलं? असा सवाल नरेंद्र मोदी यांना करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना मोदी म्हणाले की, राज ठाकरे आम्हाला काही नवीन नाहीत. गेल्या दहा वर्षांपासून आम्ही स्वबळावर देशाचं नेतृत्व करत आहोत. मात्र देशासाठी आम्ही नवीन मित्रांना संधी देत असतो, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

राज ठाकरे हे आमच्यासाठी नवीन नाहीत. आम्हाला याआधीदेखील त्यांचा पाठिंबा होता. त्यांना आमची कामं आवडल्याने त्यांनी हा निर्णय़ घेत पाठिंबा दिला. राज ठाकरे महाराष्ट्राच्या विकासाला हातभार लावतील, असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

पुणे, कणकवलीनंतर आता कल्याणला होणार सभा
मोदींना बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे हे महायुतीचा प्रचार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यांनी पुणे येथे भाजपच्या प्रचारसभेसाठी उपस्थितांना संबोधित केलं. तर दुसरीकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील कणकवली येथे नारायण राणे यांच्यासाठी सभा घेतली होती. कल्याण येथे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारसभा घेतली.

Post a Comment

0 Comments