प्रणिती शिंदे दिल्ली गाठणार का?, राम सातपुते डाव पलटणार


बार्शी |

सोलापूर लोकसभा मतदार संघात यंदा दोन तरुण आमदारांची तगडी फाईट पाहायला मिळाली. सोलापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून आमदार राम सातपुते यांना तर महाविकास आघाडीकडून आमदार प्रणिती शिंदे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. सोलापूर लोकसभा मतदारसंघात 59 टक्के मतदान झाले आहे. मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत 0.78 टक्क्यांनी मतदान वाढले आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मोहोळ आणि दक्षिण सोलापूर मतदारसंघ हा दोन्ही उमेदवारांच्या विजयात निर्णायक भूमिका पार पाडणार आहे.  सोलापूर लोकसभा मतदारसंघात वाढलेला मतदानाचा टक्का कोणाच्या पथ्थ्यावर पडतो हे चार जूनलाच कळणार आहे.

भाजपकडून माळशिरस मतदारसंघाचे आमदार राम सातपुते यांना ऐनवेळी दिलेली उमेदवारी चर्चेचा विषय ठरली होती. तर काँग्रेसकडून सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी दोन महिनेआधीच आपल्या प्रचाराचा नारळ फोडला होता. सोलापूर लोकसभा मतदारसंघात वंचितच्या उमेदवाराने ऐनवेळी घेतलेली माघार, त्यानंतर वंचितकडून अपक्ष आतिश बनसोडे यांना दिलेला पाठिंबा काँग्रेसला बळ देणारा ठरला आहे. भाजपचे उमेदवार राम सातपुते आणि काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यामध्ये या मतदारसंघात थेट लढत आहे.

Post a Comment

0 Comments