सोलापूर |
सोलापुरातून मोठी बातमी समोर आली आहे. एका तरुणीनं तलावात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे. रागाच्या भरात या तरुणीनं हे कृत्य केल्याची माहिती समोर येत आहे. सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज तलावात या तरुणीनं उडी मारली. मात्र बोटिंग क्लबच्या तरुणांच्या सतर्कतेमुळे या तरुणीचा जीव वाचला आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सोलापूरमध्ये एका तरुणीनं तलावात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. या तरुणीने शहरातील छत्रपती संभाजी महाराज तलावात उडी मारली. घरात राहू नको असं कुटुंबातील व्यक्ती म्हटल्यामुळे रागाच्या भरात या तरुणीने तलावात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे.
या तरुणीने रगाच्या भरात तलावात उडी मारली, मात्र त्या ठिकाणी असलेल्या बोटिंग क्लबच्या तरुणांच्या सतर्कतेमुळे या तरुणीचा जीव वाचला आहे. तलावात बुडत असलेल्या या तरुणीला या तरुणांनी प्रसंगावधान राखत वाचवलं.
0 Comments