पुणे |
राज ठाकरे यांनी नारायण राणेंचा विनंतीला मान देत कणकवली येथे सभा घेतली. यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत राज ठाकरेंनी नारायण राणेंना निवडून देण्याचे आवाहन केले. दरम्यान, राज ठाकरे आता भाजपसाठी सभांचा धडाका लावणार आहेत. पुण्यातही राज ठाकरेंची सभा होण्याची शक्यता आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपने पुण्याचे माजी महापौर असलेल्या मुरलीधर मोहोळ यांना मैदानात उतरवले आहे. शिवाय, पुण्यात राज ठाकरेंची साथ सोडत वंचितकडून उमेदवारी मिळवलेले वसंत मोरे ही रिंगणात आहेत. अशातच मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ पुण्यात राज ठाकरेंची सभा पार पडणार आहे. येत्या 10 तारखेला राज ठाकरेंची सभा होईल. पुण्यात नदी पात्रात राज ठाकरेंची सभा होण्याची शक्यता आहे. कणकवलीनंतर राज ठाकरेंची पुण्यात होणार सभा होणार आहे.
0 Comments