राज्यातील महत्त्वाची दूध संस्था महानंद डेअरीवर गुजरातच्या मदर डेअरीचा ताबामुंबई |

महानंद डेअरीवरुन मागच्या काही दिवसांपासून विरोधकांनी घमासान केलं होतं.  महानंददेखील गुजरातला हलवण्याचा घाट घातला जातोय, असा आरोप केला होता. 

महानंद डेअरीचा ताबा नॅशनल डेअरी डेव्हलपमेंटकडे गेला आहे. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड यांची उपकंपनी असणाऱ्या गुजरातचया मदर डेअरी यांना 'महानंद' चालवण्यासाठी देण्यात आली आहे. मात्र येथून निघणारे उत्पादन महानंदा नावाने असणार आहे.

 मुंबईतल्या गोरेगाव येथे असलेली महानंदा डेअरी तोट्यात असल्यामुळे राज्य सरकारच्या वतीने नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाला कळविण्यात आले होते.  त्यानुसार राज्य सरकारने आता नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड यांच्याबरोबर करार करून महानंदा डेअरीचा ताबा दिला आहे.

 नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डासोगबत पाच वर्षासाठी हा करार करण्यात आला असून एवढा काळ महानंदा डेअरी बोर्डच्या ताब्यात असणार आहे.

Post a Comment

0 Comments