“सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करण्याबाबत डील झाली होती”, या नेत्यांनी केला राजकीय गौप्यस्फोट


मुंबई | 

सध्या लोकसभा निवडणूक सुरू आहे. जिकडे तिकडे लोकसभा निवडणुकीने वातावरण दंग झालं आहे. अशातच आता विधानसभा निवडणुकीच्या चर्चांना जोर आला आहे. मागील विधानसभा निवडणुकीच्या राजकीय नाट्यावरून पुन्हा एकदा राजकीय नाट्याला रंग आला असल्याचं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. लोकसभा निवडणूक संपत नाही तोच राज्याच्या राजकारणातून अनेक गोप्यस्फोट बाहेर येऊ लागले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत मोठा गोप्यस्फोट केला आहे. सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्रीपद देण्याबाबत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवार यांच्यात मोठी डील झाल्याचं उमेश पाटील यांनी सांगितलं आहे.

2004 साली एक वेळा खासदार आणि तीन वेळा आमदार असलेले अजित पवार हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार नव्हते. विजय सिंह मोहिते पाटील, पद्मसिंह पाटील, छगन भुजबळ, मधुकरराव पिचड, आर.आर. पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे 3 ते 4 वेळा आमदार राहिलेले, तसेच मंत्रीपदाचा अनुभव असलेले मातब्बर नेते मुख्यमंत्री पदासाठी सक्षम नव्हते का?. मात्र उद्धव ठाकरे हे आमदार, खासदार नसतानाही ते मुख्यमंत्री पदासाठी सक्षम आणि अनुभवी कसे झाले? असा सवाल उमेश पाटील यांनी उपस्थित केला आहे.

मागील विधानसभेच्या सुरूवातीला शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे गटनेते पद होते. तेव्हा ते मुख्यमंत्री पदाचे दावेदार देखील होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद भूषवलं आहे. त्यावेळी अडीच वर्षे शिवसेना मुख्यमंत्री पदाचा दावेदार असल्याचं सांगितलं तर त्यानंतर अडीच वर्षे राष्ट्रवादीतून सुप्रिया सुळे  यांना मुख्यमंत्री पदाचा दावेदार असल्याचं सांगितलं गेलं. यामध्ये असं बोललं जात आहे की, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते. मात्र संजय राऊत आणि अनिल देसाई यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली महिला मुख्यमंत्री करायचं स्वप्न :
राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली महिला मुख्यमंत्री व्हावी असं स्वप्न शरद पवार यांचं स्वप्न होतं, असा दावा उमेश पाटील यांनी केला होता. म्हणून महाविकास आघाडी तयार केली आणि पहिल्या अडीच वर्षात शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद दिलं. त्यानंतर त्यांना सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्रीपद देणार होते अशी खळबळजनक माहिती उमेश पाटील यांनी दिली.

शरद पवार यांनी केवळ पुत्रीप्रेमापोटीमुळे हे सर्व केल्याचं उमेश पाटील म्हणाले आहेत. अजितदादांपासून अनेक ज्येष्ठ नेत्यांना मुख्यमंत्रीपदापासून लांब ठेवण्यात आलं होतं, असं उमेश पाटील म्हणाले आहेत

Post a Comment

0 Comments