उजनी जलाशयात बुडालेल्या सहा जणांचे मृतदेह सापडले


करमाळा |

उजनी धरणाच्या जलाशयामध्ये मंगळवारी बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत बुडालेल्या सहा जणांचे मृतदेह शोधण्यात आज सकाळी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाला यश आले. मात्र त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. आज दुर्घटनेच्या तिसऱ्या दिवशी सकाळपासून बुडालेल्या व्यक्तींचा शोध घेण्याची मोहीम सुरू करण्यात आली होती. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांना या व्यक्ती आढळून आल्या मात्र त्या मृतावस्थेत. उजनीकाठ नातेवाईकांच्या आक्रोशाने पुन्हा गहिवरला.

या दुर्घटनेतील गोकुळ दत्तात्रय जाधव (वय ३०), कोमल गोकुळ जाधव ( वय २५), माही गोकुळ जाधव (वय ३), शुभम गोकुळ जाधव (वय अठरा महिने, सर्व रा. झरे ता. करमाळा) अनुराग ज्ञानदेव अवघडे (वय २६), गौरव धनंजय डोंगरे (वय २४ रा. कुगाव ता. करमाळा) यांचा शोध लागला असून सहाही जण मृत्युमुखी पडले आहेत.

Post a Comment

0 Comments