लाच घेणारा तलाठी गजाआड, कळंब पोलिसात गुन्हा दाखल


धाराशिव |

भावाच्या नावे खरेदी केलेल्या शेतजमिनीचा फेरफार करण्यासाठी चार हजाराची लाच मागून तीन हजार रुपये स्वीकारणाऱ्या लाचखोर तलाठ्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कल्याण राठोड असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे.

भावाच्या नावे खरेदी केलेल्या शेत जमिनीची नोटीस काढून फेरफारला नोंद करण्यासाठी चक्क चार हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली. ही सगळी प्रक्रिया करण्यासाठी त्याचबरोबर साहेबालाही काही रक्कम देण्यासाठी पैसे द्यावे लागतील असे म्हणून कळंब तालुक्यातील इटकूर सज्जा येथे तलाठी असलेल्या कल्याण शामराव राठोड (वय 43) याने दिनांक १४ मे रोजी तक्रारदाराकडे चार हजार रुपयांची मागणी केली. 

तरजोडीअंती तीन हजार रुपयांची रक्कम लाच म्हणून स्वीकारण्यासाठी तयारीही दर्शविली. याबाबत कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचखोर तलाठी राठोड यास ताब्यात घेण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments