राम सातपुते प्रामाणिक, टक्केवारी घेणारा खासदार नाही होणार, नितीन गडकरी यांनी दिली शाबासकीसोलापूर |

 पंढरपूर येथे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे उमेदवार राम सातपूते यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप-महायुतीचे सरकार सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. मागील १० वर्षांत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केंद्राच्या अनेक योजनांचा लाभ मिळाला आहे. सोलापूरची जनता विकासाला प्राधान्य देणाऱ्या भाजप-महायुतीला पुन्हा विजयी करेल असा विश्वास व्यक्त केला.

 उमेदवार राम सातपुते यांच्या कार्याचे कौतुक करताना गडकरी म्हणाले, मी विद्यार्थी परिषदेतून घडलेला कार्यकर्ता आहे, तसाच राम सातपुते ही असून त्याला मी वीस वर्षापासून ओळखतो, राम सातपुते काम करणारा इमानदार कार्यकर्ता आहे, टक्केवारी घेणारा खासदार होणार नाही या शब्दात घडते यांनी सातपुते यांना शाबासकी दिली.


 

 

Post a Comment

0 Comments