बीड |
राज्यात लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात अनेक दिग्गज नेतेमंडळी उतरले आहेत. त्यामुळे राज्यात लोकसभा निवडणुकीत चुरशीची लढत होणार आहे. अशातच राज्यातील बीड लोकसभा मतदारसंघ पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. परंतु आता पुन्हा एकदा हा मतदारसंघात मोठ्या उलाढाली होताना दिसत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये मोठ्या उलाढाली झाल्या आहेत. माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला राम राम ठोकत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे सुरेश नवले हे आता पंकजा मुंडेंच्या विरोधात प्रचार करणार आहेत.
(Advertise)
सुरेश नवले यांच्या शरद पवार गटाच्या पक्षप्रवेशामुळे बाजपला मोठा धक्का बसला आहे. सुरेश नवले हे आता महाविकास आघाडीचे नेते बजरंग सोनवणे यांचा प्रचार करणार असल्याने एकप्रकारे बजरंग सोनवणे यांचं पारडं जड असल्याचं दिसत आहे. सुरेश नवले यांनी शिंदेसेनेला जय महाराष्ट्र करताना त्यांच्याकडे एकनाथ शिंदे यांच्याकडे लाभार्थ्यांची गर्दी होत असल्याने निष्ठावंत शिवसैनिकांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत असल्याचा आरोप केला आहे.
एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसत राज्यात नवीन सत्ता स्थापन केली त्यावेळी माजी मंत्री सुरेश नवले हे देखील त्यांच्यासोबत गेले होते. मात्र आता शिंदे यांच्या शिवसेनेत निष्ठावंत शिवसैनिकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत माजी मंत्री सुरेश नवले यांनी शिंदेसेनेच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आहे.
याशिवाय सुरेश नवले हे आगामी काळात बीडमधून विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. तसेच सुरेश नवले यांनी तयारी देखील सुरु केली आहे. माजी मंत्री सुरेश नवले यांनी बीडमध्ये एक कार्यकर्ता मेळावा घेतला आणि या मेळाव्यामध्ये ही घोषणा केल्याची बाब उघडकीस आली आहे
0 Comments