पुणे |
लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने जीवन संपवले. ही धक्कादायक घटना आज सकाळी तळेगाव येथे उघडकीस आली. सूरज राजेंद्र रायकर (२८, रा. माळी नगर, तळेगाव) असे आत्महत्या केलेल्या नवरदेवाचे नाव आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज याचा आज लग्नसोहळा पार पडणार होता. घरात सगळीकडे लग्नाची धामधूम सुरू होती. दरम्यान, सकाळी त्याने मामाला फोन केला. “मला लग्न करायचे नाही”, असे सांगून तो घराबाहेर पडला.
घरातल्या मंडळींनी सर्वत्र शोधाशोध केली. मात्र, सुरज मिळून आला नाही. काही वेळानंतर घरापासून काही अंतरावर वाण्याचा मळा येथील विहिरीजवळ सुरज याची दुचाकी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांना शंका आल्याने त्यांनी काही स्वयंसेवकांच्या मदतीने विहिरीत शोध घेतला. त्यावेळी सुरज याचा मृतदेह मिळून आला. या घटनेमुळे तळेगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहे.
0 Comments