मुंबई |
आयपीएल सामन्याचा रोमांच सुरु आहे. आयपीएलमधून अनेक चांगले खेळाडू मिळत आहे. रविवारी मुंबई विरुद्ध चेन्नई आणि कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स या दोन्ही सामन्यात क्रिकेट प्रेमींना फटकेबाजीचा आनंद मिळाला.
एका षटकाचा शेवटचा चेंडू टाकताना जोसेफ याची लय बिघडली. त्याच्यासमोर स्ट्राइकवर साल्ट होता. हा बॉल टाकल्यानंतर त्याने नोबॉल टाकला. त्यानंतर दुसरा बॉल वाइड टाकला. त्यानंतर पुन्हा वाइट बॉल टाकला, त्यावर चौकार गेला. मग टाकलेल्या तीन चेंडूत सात धावा गेल्या होत्या. मग पुन्हा चौथा चेंडू टाकला, तो नोबॉल गेला. त्यानंतर मिळालेल्या फ्रिहिटवर साल्ट याने षटकार खेचला. या पद्धतीने शेवटच्या चेंडूत 14 धावा त्याने दिल्या. एकूण या षटकात 10 चेंडू टाकत 22 धावा जोसेफ याने दिल्या.
0 Comments