बार्शीत कचऱ्याची होळी करून स्वच्छतेचा संदेशबार्शी |

 वृक्ष संवर्धन समितीतर्फे बेलदार समाज मंदिर 422 या ठिकाणी परिसर स्वच्छता करण्यात आली. यावेळी त्या परिसरातील सर्व प्लास्टिक कचरा गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला. तेथील नागरिकांना बोलवून स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सर्व कचरा एकत्र करून त्याची होळी करण्यात आली. यावेळी तेथील नागरिकांनी देखील कचरा बाहेर न फेकतात नगरपालिकेच्या कचरा गाडी टाकण्याचा निर्धार केला.


यावेळी वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष उमेश काळे राहुल तावरे ,उमेश नलवडे, प्रा. शशिकांत धोत्रे, संतोषकुमार गायकवाड, बुगडे सर चंद्रकांत उलभगत, गणेश कदम उदयकुमार पोतदार ,हमने सर, गणेश घोलप, अक्षय भोईटे आणि इतर वृक्ष संवर्धन समितीचे सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments