बीडचा पार्सल बीडला पाठवा, सोलापुरात भाजप उमेदवार ट्रोल


सोलापूर |

भाजपने सोलापूरमधून राम सातपुते यांना उमेदवारी दिली आहे. राम सातपुते हे बाहेरच्या जिल्ह्याचे आहेत. असं असतानाही भाजपने त्यांना उमेदवारी दिल्याने स्थानिकांकडून सातपुते यांना ट्रोल केलं जात आहे.

बीडचं पार्सल बीडला पाठवा, असा मजकूर सोशल मीडियातून व्हायरल होत आहे. सातपुतेंचं इथे काय काम? त्यांचा जिल्ह्याशी काय संबंध? अशी विचारणाही सोशल मीडियातून होत आहे. ट्रोल केलं गेल्याने सातपुते यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.


भाजपचे आमदार राम सातपुते यांनी ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे. अशा पद्धतीचं ट्रोलिंग म्हणजे पराभूत मानसिकतेचे लक्षण आहे. मी सोलापूर जिल्ह्यातला आमदार आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या साखर कारखान्यामध्ये माझ्या आई-वडिलांनी ऊस तोडीचे काम केलं आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी या इटलीहून आल्या आहेत. त्या त्यांना चालल्या. मी चालत नाही का?, असा सवाल राम सातपुते यांनी केला आहे.

Post a Comment

0 Comments