बार्शीतून 200 मराठा उमेदवारी अर्ज भरणार, बैठकीत निर्णय - आनंद काशिद



बार्शी - निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांची घोषणा केली असून धाराशिव लोकसभेसाठी 7 मे रोजी मतदान होत आहे. त्याच, पार्श्वभूमीवर धाराशिव लोकसभेला मराठा समाज 1 हजार पेक्षा अधिक उमेदवार उभा करणार आहे, त्यापैकी बार्शी तालुक्यातून 200 पेक्षा अधिक उमेदवार उभा करायचा निर्णय मराठा समाजाच्या बांधवांच्यावतीने शासकीय विश्रामगृह याठिकाणी झालेल्या बैठकीत एकमुखी घेण्यात आल्याचे उपोषणकर्ते आनंद काशिद यांनी सांगितले. 

#यावेळी वेगवेगळ्या कमिट्या स्थापन करण्यात आल्या असून अनेक गावांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याकरता लोकवर्गणी गोळा करायला सुरुवात केली आहे. मराठा समाजाने कोणत्याही परिस्थितीमध्ये जरांगे पाटलांच्या शब्दाच्या पुढे जायचं नाही, असा निश्चय व्यक्त केला. यावेळी एक मराठा लाख मराठा, जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणाही देण्यात आल्या. यावेळी आनंद काशीद यांच्यासह विनायक घोडके, पोपट डमरे, भारत देशमुख, अजित जगदाळे, विक्रम घाईतिडक, अतुल गाढवे अविनाश लोंढे, राजाभाऊ कापसे यांच्यासह समाज बांधव या बैठकीसाठी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments