सोलापूरात नितेश राणे आणि टी.राजा यांच्यावर गुन्हा दाखल


सोलापूर |

हिंदू जनआक्रोश मोर्चा सभेत चितावनीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे आणि आमदार टी. राजा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापुरातील जेल रोड पोलीस ठाण्यामध्ये या दोन्ही आमदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आमदारांसह सकल हिंदू समाज समन्वयक सुधीर बहिरवडे आणि मंचावर उपस्थित ८ ते १० पदाधिकार्‍यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला.

दोन्ही आमदारांकडून भाषणादरम्यान दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करणारी वक्तव्य झाली होती. याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अधिक तपास जेलरोड पोलीस करत आहे.

Post a Comment

0 Comments