T-20 क्रिकेटला फिरकीचा नवा बादशाह मिळालाT20 क्रिकेटला जागतिक क्रमवारीत एक नवा गोलंदाज मिळाला आहे. भारतीय फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई आता ICC T20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत गोलंदाजीत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. रवि बिश्नोईने गेल्या अनेक  महिन्यांपासून प्रथम स्थानावर विराजमान असलेल्या राशिद खानला बाजूला करत ही कामगिरी केली आहे.

रवी बिश्नोईच्या खात्यात आता 699 गुण आहेत. तो राशिद खान (692) पेक्षा 7 रेटिंग गुणांनी पुढे गेला आहे. या यादीत श्रीलंकेचा वानिधू हसरंगा (679) तिसऱ्या क्रमांकावर, आदिल रशीद (679) चौथ्या क्रमांकावर आणि महिश तिक्षणा (677) पाचव्या स्थानावर आहे. म्हणजेच T20 आंतरराष्ट्रीय गोलंदाजांच्या क्रमवारीत फिरकीपटू अव्वल पाच नंबरवर स्थानांवर आहेत.

Post a Comment

0 Comments