सौ. प्रेमाताई पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात महापरिनिर्वाणदिन साजरा


गौडगाव/प्रतिनिधी :

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रेमाताई पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ६७ व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य कुंडलिक महाराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. 

महापरिनिर्वाण दिन किंवा महापरिनिर्वाण दिवस हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन असून तो ६ डिसेंबर रोजी आयोजित केला जातो. आंबेडकरांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण (निधन) झाले होते, याच्या दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिमसंस्कार करण्यात आले. बाबासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य जातिवाद दूर करण्यासाठी आणि गरीब, दलित व मागास वर्गीयांच्या विकासासाठी समर्पित केले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे महामानवास अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश-विदेशातून मोठ्या संख्येने भीम अनुयायी दाखल होत असतात.

या निमित्ताने गौडगाव येथे महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन ही करण्यात आली. यावेळी प्रा. जाधव सर, नागटिळक सर, ओम घोडके, निकाळजे सर, पाटील सर, व इतर सर्व कर्माचारी वृंद उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments