अजित पवार यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट, बार्शी शहर पोलिसात गुन्हा दाखल




उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'पीएच.डी.' करून दिवे लावण्याच्या केलेल्या विधानावरून समाज माध्यमांवर चांगलीच चर्चा रंगली होती. त्यांना ट्रोल केले जात होते. अशातच अजित पवारांच्या त्या वक्तव्यावरक आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या एका व्यक्तीच्या विरोधात बार्शी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजितदादांच्या पीएच.डी. करून दिवे लावण्याच्या वक्तव्यावरून फेसबूकला गौरव गजानन डोंगरे याने आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. अकोला येथील रहिवासी असणाऱ्या गौरवने शनिवारी ही आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने ही फेसबूक पोस्ट डिलीट केली आहे.

Post a Comment

0 Comments