ज्येष्ठ पत्रकार महरूम नसरुद्दीन फयाजोद्दीन सय्यद कौठाळकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्नवैराग |

दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील विजय साप्ताहिक संपादक महरुम नसरुद्दीन फयाजुद्दीन सय्यद कौठाळकर यांच्या 61 व्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक उर्दु शाळा येथे सर्व प्रथम नसरुद्दीन फैयाजोद्दीन सय्यद कौठाळकर यांच्या प्रतिमेस वैराग नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष निरंजन मालक भूमकर व माजी ग्रामपंचायत सदस्य माजीमंत्री दिलीपरावजी सोपल समर्थक अरुणभाऊ सावंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी नगरसेवक शाहूराजे संतोष नाईक निंबाळकर, उपनगराध्यक्ष निरंजन मालक भूमकर, मौलाना अब्बास कादरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

तसेच अण्णा ग्रुप संस्थापक माजी ग्रामपंचायत सदस्य अध्यक्ष वैजनाथ आदमाने, नगरसेवक  विजय लांडगे, मुस्लिम समाजाचे नेते इस्माईल भाई पटेल, नागनाथ खेंडाड,रोफभाई बागवान, सुरेश खेंदाड ,तय्यबभाई शेख, सह तेजश न्यूज संपादक राहुल भालशंकर यांच्या हस्ते विद्यार्थी व विद्यार्थ्यांनीना मिठाई वाटप करण्यात आली
त्यानंतर विजय परिवार यांच्या वतीने मैनोद्दीन फयाजोद्दीन सय्यद कौठाळकर, यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला.

 यावेळी विजय न्यूज मुख्य संपादक मुज्जमिल नसरुद्दीन कौठाळकर, समीर नसरुद्दीन कौठाळकर, मोहम्मद अतीक दरवाजकर, समीर दरवाजकर, अमन कौठाळकर  आब्बाजान कौठाळकर, अहमद कौठाळकर सह विजय न्यूज परिवाराचे सदस्य उपस्थित होते. शेवटी उपस्थित मान्यवरांचे शार्दुल पठाण यांनी आभार मानले व कार्यक्रमाचा समारोप झाला

तसेच मोहल्ला गल्ली सुग्राबी मंजिल येथे विजय परीवाच्या वतीने  जामा मज्जिदचे मौलाना मोहम्मद वकार राजानुरी यांच्या मार्गदर्शनाखाली कुराण पठण व शेरनी वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.

Post a Comment

0 Comments