कोयत्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू ; आरोपीला अटक करा



सोलापूर |

पूर्व वैमनस्यातून शेतकऱ्यावर कोयत्याने हल्ला केल्याने त्यात गंभीर जखमी होऊन सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचाराला आणण्याच्या पूर्वीच शेतकऱ्याचा मृत्यू झाला. हि घटना 13 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी आठ वाजता मौजे सराटी तालुका तुळजापूर येथे घडली.

नरसप्पा बाबुराव पाटील असे मयत शेतकऱ्याचे नाव असून शेत विहीरीच्या पाणी देण्याच्या कारणावरून, जिवे मारण्याच्या उद्देशाने पाठीमागून डोक्यामध्ये व समोरून तोंडावर जबर वार करण्यात आले होते. 

त्यामध्ये नरसप्पा बाबुराव पाटील हे पूर्णपणे गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आहेत अशी माहिती मिळाली असता त्यांचे भाऊ पंडित बाबुराव पाटील व पुतण्या रमेश पंडित पाटील यांनी घटना स्थळी जाऊन त्यांना अणदूर,तालुका तुळजापूर येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यास घेऊन गेले असता रुग्णालय बंद असल्याकारणाने त्यांना सोलापूर सिव्हिल शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले.

दरम्यान सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मयताच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरू आहे, गावातील नवनाथ अप्पाराव पाटील यांनीच ही मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला असून जोपर्यंत पोलीस गुन्हेगाराला ताब्यात घेत नाहीत तोपर्यंत प्रेत ताब्यात घेत नाही असे सांगितले.

Post a Comment

0 Comments