धाराशिव लोकसभा निवडणूक लढवणार ? राजकारणातील प्रवेशाबाबत कालीचरण महाराज स्पष्टच बाेलले


छत्रपती शिवाजी महाराज यांचे हिंदवी स्वराज्य पूर्ण व्हावे ही इच्छा आहे. इराण पासून श्रीलंका पर्यंत भारताचे जेवढे तुकडे झाले आहेत. त्यांचा पुन्हा एकत्र भारत व्हावा. त्यामुळेच राजकारणाचे आम्ही हिंदूकरण व्हावे अशी मागणी करीत आहाेत. देशातील हिंदूंनी एकत्र येऊन एक व्हाेटर बँक तयार करण्यासाठी संघटित झाले पाहिजे. जेणेकरुन हिंदू राष्ट्र हाेणे सुकर हाेईल असे मत कालीचरण महाराज यांनी साेलापूरात माध्यमांशी बाेलतना व्यक्त केले.कडवे आणि तिखट भाषा असणाऱ्या आमच्यासारख्यांचे राजकारणात काही होऊ शकत नाही असे मत कालीचरण महाराज यांनी व्यक्त केली. धाराशिव येथून निवडणूक लढणार आहात का या प्रश्नावर कालीचरण महाराज यांनी काय सांगता अशी बातमी तुमच्याकडे आहे असे म्हणत याबाबत मला तर माहित नाही परंतु कडवे आणि तिखट भाषा असणारे लोक चालतील का असा प्रतिप्रश्न कालीचरण महाराज यांनी केला.

ओवैसी चालतात मग कालीचरण महाराज का नाही यावर ते म्हणाले, मला समजत नाही. जनता ठरवू शकते ते कसे आहे. मी स्पष्ट बोलणारा व्यक्ती आहे. जनतेने जर सांगितले निवडणूक लढवू पण मला कोणता पक्ष तिकीट देईल असेही त्यांनी म्हटले.ते म्हणाले आमचं काम कट्टर हिंदू व्हाेटर बनवायचा आहे. जे हिंदू राजे (लाेकप्रतिनिधी) आहेत त्यांना जिंकण्यासाठी आम्ही आमचे प्रयत्न करताे. आमचं काम निवडणुकीतून राजा हाेणे नाही तर राजा बनवणे आहे.जर मी डिप्लोमॅटिक विचार करून केले असते तर आज मी जात, आंदोलन याविषयी बोललो असतो. निवडणूक लढवण्याचा मी कधीच विचार केला नाही असेही कालीचरण महाराज यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

0 Comments