सिरसावमध्ये नेत्यांना गावबंदी, मराठा आरक्षणासाठी कॅन्डल मार्च काढून नोंदवला निषेध, महिलांचा सक्रिय सहभाग


सिरसाव |

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे -पाटील यांनी सुरु केलेल्या बेमुदत उपोषणास पाठिंबा व्यक्त करण्यासाठी परंडा तालुक्यातील सिरसाव येथे सकल मराठा समाजा तर्फे ग्रामपंचायत कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येणार आहे. 

आज ३१ ऑक्टोबर रोजी मराठा आरक्षणासाठी कॅन्डल मार्च काढण्यात आला. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळालेच पाहिजे, याच प्रमुख मागणीसाठी महिला भगिनींनी ही सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली असून राज्य सरकारचा तीव्र शब्दात निषेधही व्यक्त केला आहे. गेल्या सात दिवसापासून साखळी उपोषण सुरू आहे, असून यात मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी होत आहेत. या साखळी उपोषणामध्ये महिलांचे उपस्थिती ही लक्षणीय आहे. सिरसाव गावामध्ये साखळी उपोषणे सुरू असून नेत्यांना कडक गावबंदी करण्यात आली आहे. 

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी दिरंगाई होत असल्यामुळे उपसरपंच केदार पाटील, शिवसेना युवक तालुका पदाधिकारी श्रीगणेश चोबे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डॉक्टर सेलचे तालुकाध्यक्ष डॉ विकास पवार यांनी आपल्या पदाचे राजीनामे ही दिलेले आहेत.

Post a Comment

0 Comments