उपमुख्यमंत्री अजित पवार व केंद्रीय मंत्री नारायण राणे हेच मराठा समाजातील गद्दारसोलापूर |

राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी जाणीवपूर्वक अडवणूक करीत असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, केंद्रीय मंत्री नारायण राणे, रामदास कदम हे मराठा समाजातील गद्दार असल्याचा आरोप यावेळी सोलापुरात मराठा बांधवांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.

मनोज जरांगे पाटील यानी  मराठ्यांना आरक्षण मिळावे म्हणून 17 दिवस उपोषण केले. सरकारने 30 दिवसात आरक्षण देतो असे सांगून उपोषण सोडायला लावले. त्यामध्ये जरांगे पाटील यांनी  आणखीन 10 दिवस निर्णय देण्यासाठी  सरकारला वाढवून दिले.  ती मुदत उद्या  25 तारखेला संपते. जर सरकारने आरक्षण दिले नाही तर 25 तारखेपासून पुढील आदेश येइपर्यंत मराठा समाजाचे तालुका, जिल्हापरिषद गटातील मोठे गाव , तहसील ऑफिस समोर, जिल्हा परिषदसमोर मराठा बांधवांनी साखळी उपोषण करावे असा आदेश मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी येथून जाहीर केला होता.

त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सकल मराठा समाज सोलापूर शहर जिल्हा हे जरांगे पाटील यांना ताकत देण्यासाठी त्यांचे हात बळकट करण्यासाठी उद्या दिनांक 25ऑक्टोंबर पासून पुढील आदेश येइपर्यंत सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. यावेळी गावपातळीवर कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांना (आमदार ,खासदार, मंत्री) यांना गावबंदि करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांना गावात कोणतेही कार्यक्रम घेवू देऊ नका.

Post a Comment

0 Comments