पुणे |
पुण्यमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुण्यामधील एका माजी नगरसेविकेला ब्लॅकमेल करुन तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विद्येचं माहेर घर तसेच महाराष्ट्राची संस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुण्यामध्ये चक्क एका माजी नगरसेविकेबरोबर असा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पुण्यासारख्या सुशिक्षित शहरामध्ये जुने फोटो दाखवून नगरसेविका राहिलेल्या महिलेवर बलात्कार झाल्याने शहरातील महिलांच्या सुरक्षेसंदर्भात पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, मैत्रीपूर्ण संबंधांमधून संबंधित पीडित नगरसेविकेबरोबर काढलेले फोटो दाखवून धमकावण्यात आलं. या महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची तक्रार पर्वती पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दाखल झालेल्या गुन्ह्यातील तपशीलामध्ये आरोपीचं नाव सचिन असं असल्याचं समजतं आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन आणि पीडित माजी नगरसेविकेमध्ये मैत्रीपूर्ण संबंध होते. याच संबंधांचा फायदा घेत आरोपीने नगरसेविकेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. आपले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करुन व्हायरल करण्याची धमकी सचिनने या माजी महिला नगरसेविकेला दिली.
0 Comments