सोलापूर | पतीचे परस्त्रीशी असलेले अनैतिक संबंध उघड केल्याने, चिडलेल्या पतीकडून शारीरिक व मानसिक छळ



सोलापूर |

पतीचे परस्त्रीशी असलेले अनैतिक संबंध उघड केल्याने, चिडलेल्या पतीकडून शारीरिक व मानसिक छळ केला जात असल्याची तक्रार योगिता कार्तिक रेड्डी (वय 30 हाउसिंग सोसायटी, नई जिंदगी सोलापूर) यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.

पती कार्तिक रेड्डी, सासू सुनंदा रेड्डी, नणंद सुधा कुमार व मानलेली नणंद दीपा थंबकर (सर्व रा. भाग्योदय हाऊसिंग सोसायटी, नई जिंदगी सोलापूर) अशी गुन्हा नोंदलेल्या चौघांची नावे आहेत.

फिर्यादीत म्हटले आहे की यातील फिर्यादी योगिता यांचा विवाह कार्तिक याच्याशी एप्रिल २०१७ साली झाला. लग्नानंतरच्या काही दिवसांनी फिर्यादी योगिता यांना आपल्या पतीचे परस्त्रीशी अनैतिक संबंध असल्याचे कळाले. या प्रकाराची वाच्यता झाल्याने पतीसह सासरकडील मंडळी फिर्यादीवर चिडून होते, त्यांनी तिचा मानसिक व शारीरिक छळ सुरू केला उपाशी ठेवणे, एकटीलाच काम करावयास लावणे, लग्नात मानपान व हुंडा न मिळाल्याने तसेच माहेरच्या लोकांना शिवीगाळ करणे असे प्रकार सातत्याने सुरू होते. शिवाय श्रीमंत घराण्यातील मुलीशी लग्न केले असते तर मोठ्या प्रमाणात हुंडा व सोने मिळाले असते असे म्हणून ‘तू आम्हाला व्यवसायासाठी पाच लाख रुपये घेऊन ये’ म्हणून छळ केल्याचे म्हटले आहे.दरम्यान अनैतिक संबंध असलेल्या महिलेच्या सांगण्यावरून मानसिक व शारीरिक त्रास देऊन तिचे वैवाहिक जीवन उध्वस्त केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक करीत आहेत.

Post a Comment

0 Comments