हळदुगे येथे ग्रामसेवकाला मारहाण, वैराग पोलिसात शासकीय कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखलवैराग |

शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा सोलापूर - इलेक्ट्रिक कामाचे पैसे वेळेत का दिले नाही ? या कारणावरून कार्यालयात घुसून ग्रामसेवकास मारहाण करून कार्यालयात आदळ आपट केल्याची घटना हळदुगे (ता.बार्शी) येथील ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. विश्वनाथ दत्तात्रय माहोरे (वय ३५ रा.बार्शी) असे जखमी ग्रामसेवकाचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विलास यशवंत जगताप (वय ३५ रा.हळदुगे) याच्या विरुद्ध वैरागच्या पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणि तोडफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. 

विश्वनाथ माहोरे हे काल दुपारी ग्रामपंचायत कार्यालयात काम करीत होते. त्यावेळी इंद्रजीत देशमुख याच्यासोबत आरोपी विलास जगताप आला होता. देशमुख यांनी इलेक्ट्रिक कामाचे पैसे मागितले. त्यावेळी ग्रामसेवकांनी त्याला थोडे थांबा असे सांगितले. तेंव्हा विलास जगताप याने आत्ताच्या आत्ता पैसे दे, असे म्हणून गच्ची पकडून त्यांना हाताने मारहाण करून ढकलून दिले. आणि फर्निचरची आदळ आपट केली. त्यात संगणकाचे नुकसान झाले. असे त्यांच्या फिर्यादीत नमूद आहे . फौजदार पवार पुढील तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments