'आम्हाला तुझा अभिमान आहे'; गोल्डन बॉय नीरज चोप्राचं बॉलिवूड कलाकारांनी केलं अभिनंदन



मुंबई |

भारताचा 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राने जागतिक भालाफेक स्पर्धेत 88.17 मीटरपर्यंत भालाफेकत सुवर्ण पदक पटाकवले आहे. तो जागतिक भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणारा पहिला भारतीय भालाफेकपटू ठरला आहे. सध्या अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून नीरजचं कौतुक करत आहेत. काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन नीरजचं अभिनंदन केलं आहे.

करीना कपूर खान, शाहिद कपूर, आयुष्मान खुराना, फरहान अख्तर, मलायका अरोरा, अभिषेक बच्चन, भूमी पेडणेकर यांसारखे बॉलिवूड कलाकारांनी  सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन नीरजचं अभिनंदन केले आहे. अभिनेत्री करीना कपूर खाननं नीरजचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करुन लिहिलं, 'नीरज चोप्रा, आम्हाला तुझा अभिमान आहे.'

Post a Comment

0 Comments